Opportunities in Chemical Engineering

Best Engineering program
*केमिकल इंजिनियरिंग*

"केमिकल अभियांत्रिकी हा बौद्धिक जीवनाचा नैतिक अभ्यास आहे. ”

केमिकल इंजिनियरिंग ही इंजिनियरिंगची एक मूलभूत शाखा आहे. ही शाखा माणसाच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक गरजेशी संबंधित आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थी व पालक इंजीनियरिंग शाखेला प्रवेश घेताना भविष्यकाळातील करिअरच्या संधी कोणत्या हे पाहूनच इंजिनियरिंगच्या शाखेला प्रवेश घेतात. केमिकल इंजिनिअरिंग ही शाखा 'सर्वस्पर्शी' समजली जाते, म्हणूनच करिअरच्या अनेक संधी या शाखेव्दारे उपलब्ध आहेत. 
केमिकल इंजीनियरिंगशी निगडित तेजीत असणारी क्षेत्रे म्हणजे पेट्रोलियम, पेट्रोकेमिकल, पॅालिमर, प्लास्टिक, फूड टेक्नॉलॉजी, पेपर अँड पल्प टेक्नॉलॉजी, बायोकेमिकल आणि बायोटेक्नॉलॉजी ही होत. ही क्षेत्रे केमिकल इंजिनियरिंगची अविभाज्य घटक आहेत.  
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी केमिकल इंजिनिअरिंगशी संबंधित असून त्यामध्ये टूथपेस्ट, साबण, डिटर्जंट, परफ्युम, सौंदर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ, शीतपेये प्लास्टिकच्या वस्तू, कपडे, कागद, रबर, फायबर, पेन्ट, खते, अल्कोहोल, कीटकनाशके, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, एलपीजी गॅस अशा कित्येक जीवनावश्यक वस्तूंचे उत्पादन व निर्मिती केमिकल इंजिनियर करीत असतात. साहजिकच या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
अमेरिका, कॅनडा, इंग्लंड नेदरलँड, जर्मनी तसेच अरब राष्ट्रे जसे दुबई, ओमान, बहरीन, कुवेत, इराण, इराक, सौदी अरेबिया इत्यादी राष्ट्रांत केमिकल इंजिनियर्सना नेहमीच संधी उपलब्ध असतात.  भारतातील खाजगी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज, युनिलिव्हर ग्रुप, एस्सार, एल अँड टी, दीपक फर्टीलायझर, कॅडबरी, पिडिलाइट, एशियन पेंट्स, फिनोलेक्स, प्राज इंडस्ट्रीज तसेच सरकारी क्षेत्रातील ओएनजीसी, ऑइल इंडिया लिमिटेड, एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीएल,  इफको, आरसीएफ  इत्यादी कंपन्यांमधून केमिकल इंजिनिअर्सना नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.  
तसेच पर्यावरण, बायोडीजल, अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत, माॅडेलिंग अँड सिम्युलेशन, पायपिंग, मटेरियल सायन्स, एनर्जी कंजर्वेशन, सँड रिक्लेमेशन, ऊर्जा बचत, सीएफडी इत्यादी क्षेत्रांमध्ये केमिकल इंजिनिअर्स ची मागणी वाढत आहे. 
भारतासारख्या शेतीप्रधान देशात केमिकल क्षेत्राची बायोटेक्नॉलॉजीशी व्यवस्थित सांगड घातल्यास बायोडिझेल, जैविक खते, कीटकनाशके, तणनाशके यांच्या निर्मितीतून मोठ्या हरितक्रांतीसाठी मदत होऊ शकेल. संशोधन क्षेत्रामध्येही या शाखेला खूप वाव आहे. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, बीएआरसी, डीआरडीआे, आयसीटी, आयआयटी व विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रामध्ये संशोधन केले जाते.

पात्रता:-
 डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली किमान पात्रता माध्यमिक शाळा दहावी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, विज्ञान आणि कमीतकमी 35  टक्के असणे आवश्यक आहे.

बारावीनंतर (Science- PCM or PCB) विद्यार्थ्यांना थेट दुसर्‍या वर्षी किंवा पहिल्या वर्षामध्येही प्रवेश मिळतो.

पॉलिटेक्निकमध्ये प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

1. एसएससी मार्कशीट.
२. शाळा सोडल्याचा दाखला.
3. राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
4. इयत्ता आठवी आणि नववी मार्क शीट किंवा प्रोफार्मा झेड.
5. अधिवास प्रमाणपत्र
6. विद्यार्थी आधार कार्ड.
7. तहसीलदार कडून मिळकत प्रमाणपत्र (टीएफडब्ल्यूएससाठी)
8. जातीचे प्रमाणपत्र
9. जात वैधता प्रमाणपत्र.
१०. विद्यार्थ्यांचे आधार लिंक्ड राष्ट्रीयीकृत बँक खाते.
11. एचएससी मार्कशीट व शाळा सोडल्याचा दाखला (एसएससी विद्यार्थ्यांसाठी).

प्रवरा केमिकल अभियांत्रिकी विभागाची वैशिष्ट्ये

१. अनुभवी व पात्र असलेली प्राध्यापक.
2. सर्वोत्कृष्ट प्रयोगशाळे.
3. एमएसबीटीई, मुंबईकडून मागील तीन वेळेस शैक्षणिक उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाले.
4. 100 टक्के प्लेसमेंटस.
5. आमचे माजी विद्यार्थी विविध उपक्रमांसाठी प्लेसमेंट्स, औद्योगिक भेटी, इनप्लांट ट्रॅनिंग, प्रायोजकत्व, तज्ज्ञ व्याख्याने इत्यादींसाठी योगदान देतात.
6. इनपलांट प्रशिक्षण सुविधा.
7. विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन.
8. चांगले शैक्षणिक निकाल.
9. चांगल्या खेळाच्या सुविधा.
१०. आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक वेळा एमएसबीटीई, मुंबई येथे शैक्षणिक अव्वल स्थान मिळवले.

For more information, kindly contact to

1. Prof. P. R. Gulave (8329394100)
Lecturer in Chemical Engineering.

2. Prof. N. M. Garad ( 9890844774)
HOD Chemical Engineering.

3. Prof. D. C. Magar ( 9423787412)
Principal
Pad. Dr. Vitthalrao Vikhe Patil Polytechnic, loni

Registration Form

डिप्लोमा प्रथम वर्षासाठी प्रवेश (एसएससी नंतर) -

https://forms.gle/KGdfD8QhvpGpU4xq5.

डिप्लोमा डायरेक्ट सेकंड वर्ष प्रवेश (एचएससी नंतर) -

https://forms.gle/TTAc4YCUW54uYrUv9.

Comments

Popular posts from this blog

Role of Chemical Engineers in Food and Food processing Industry

Disinfection Methods